स्वप करा आईश करा. जन्नत movie मध्ये पाहिलेला हा डायलॉग आहे तो क्रेडिट कार्ड वर त्याच्या Gf ला खूप सारी खरेदी करून गिफ्ट , गाडी , आणि बरच काही घेतो.
आपणही क्रेडिट कार्ड वापरत असताना असच भरपूर शॉपिंग करत असतो पण क्रेडिट कार्ड आपल्या फायद्याचे आहे की तोट्या चे हे जाणुन घेऊ .
Credit Card म्हणजे आर्थिक व्यवहारासाठी वापरले जाणारे एक अत्यंत सोयीस्कर साधन आहे. त्याचे अनेक फायदे आहेत, परंतु त्याचबरोबर काही तोटेही आहेत. या लेखात आपण क्रेडिट कार्डच्या फायद्यांबरोबरच त्याचे तोटे देखील पाहणार आहोत.
फायदे
आपण ज्या बँक किंवा कंपनी चे क्रेडिट कार्ड घेतो ती बँक आपल्याला वापरण्यासाठी खूप सारे पैसे उधारिवर देतात. आणि त्या बदल्यात काही charge घेतात तर काही जण फ्री मध्ये कार्ड देतात . उधारीची रक्कम तुम्ही कोणत्याही वेळी, कुठेही, काहीही खरेदी करू शकता, ज्यामुळे तातडीच्या आर्थिक गरजा सहज भागवता येतात.
क्रेडिट स्कोर : आपण जेव्हा एखादे लोन किंवा होम लोन घेताना आपला क्रेडिट स्कोअर चेक केला जातो. तेव्हा आपल्याला आपण योग्य वेळी क्रेडिट कार्ड चे पेमेंट केले तर आपला स्कोअर चांगला राहतो व क्रेडिट स्कोअर वढण्यासाठी मदत होते.
रिवॉर्ड पॉइंट्स : अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या खरेदीसाठी रिवॉर्ड पॉइंट्स देतात, ज्यामुळे तुमच्या खरेदीतून तुम्हाला फायदा होतो. हे पॉइंट्स नंतर विविध वस्तू किंवा सेवांमध्ये रूपांतरित करता येतात.
व्याज मुक्त :- क्रेडिट कार्ड तुम्हाला एक मोठी सोय करून देते परत फेड करण्यासाठी 20 ते 50 दिवसा मध्ये तुम्ही खर्च केलेले पैसे बिगर व्याजी परत करता येतात.
तोटे
सर्वात मोठा तोटा म्हणजे तूम्ही जर क्रेडिट कार्ड च बिल भरण्या साठी दिलेल्या कालावधी पेक्षा एक दिवस जरी लते झालं तर तुम्हाला 30 ते 48 % एवढा व्याज दरात वसुली केली जाते.
क्रेडिट कार्ड हरवले तर गैव्यवहार होण्याची शक्यता जास्त असते .
क्रेडिट कार्ड एक नशे सारखं आहे . ते वापरत असताना अधिक खर्च करण्याची सवय लागू शकते . त्या मूळ आपण अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
अधिक वाचा :- भारतातील सर्वात जास्त Dividend देणारे 5 स्टॉक